खोचीत प्रमुख मार्गावरून दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोचीत प्रमुख मार्गावरून दौड
खोचीत प्रमुख मार्गावरून दौड

खोचीत प्रमुख मार्गावरून दौड

sakal_logo
By

खोचीत प्रमुख मार्गावरून दौड
खोची ः परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मूर्तीला वारणा, कृष्णा, पंचगंगा यांच्या संगम जलाने जलाभिषेक केला. यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ चा जयघोष केला. ध्वजासह प्रमुख मार्गावरून दौड काढली. सोहळ्याचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अरुणोदय मर्दानी खेळ आखाडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्ववादी शिवभक्त यांच्यातर्फे केले होते. ग्रामदैवत कल्लेश्वर व श्री गणेश यांच्या मूर्तीला अभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व शस्त्रास्त्रांचे पूजन झाल्यानंतर प्रेरणा मंत्रांचे उच्चारण केले. ध्येय मंत्राने सोहळ्याची सांगता केली.