खोचीत घर, शेतीचे लाखोंचे नुकसान

खोचीत घर, शेतीचे लाखोंचे नुकसान

02998
खोची : येथील वादळी पावसामुळे आडसाली ऊस जमिनीवर पडला आहे.
----
खोचीत घर, शेतीचे लाखोंचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
खोची, ता. १४ : विजेच्या कडकडाटासह सोमवारी सायंकाळी झालेल्या वळवाच्‍या पावसामुळे परिसरातील घरांचे व शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भेंडवडे येथील शोभा रावसाहेब पाटील यांच्या ग्रीन हाऊसचे छप्पर उडून गेले आहे. त्यांचे सुमारे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रीन हाऊसमध्ये जरबेरा फुले होती. अनेक ठिकाणी आडसाली ऊस जमिनीवर लोळत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे.
काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वळिवाने परिसरात धुमाकूळ घातला होता. वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्यामुळे अनेक घरांचे पत्रे, जनावरांची शेड उडून पडल्याने घरातील धान्य भिजल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर माळरानावरील जनावरांचे शेड असणाऱ्या शेतकऱ्यांचे पत्रे उडून गेल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. महिनाभर खोचीसह परिसरात वळिवाने हुलकावणी दिली होती; परंतु काल झालेल्‍या वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान केले. अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. बऱ्याच ठिकाणी वीजप्रवाह करणाऱ्या तारा तुटून पडल्यामुळे रात्रीपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर दुरुस्ती करीत वीजपुरवठा सुरळीत केला. खोडवा ऊस पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून तसेच ज्या नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत यांची पाहणी करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com