वीज वितरण कर्मचारी सुयोग जाधव यांची बदली रद्द करावी,खोची ग्रामस्थांकडून निवेदन

वीज वितरण कर्मचारी सुयोग जाधव यांची बदली रद्द करावी,खोची ग्रामस्थांकडून निवेदन

सुयोग जाधव यांची
बदली रद्दची मागणी
खोची, ता. ७ ः येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बाह्य स्त्रोत कर्मचारी सुयोग जाधव यांची अन्यत्र झालेली बदली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी खोची ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता जयसिंगपूर, उपअभियंता पेठवडगाव यांच्याकडे केली आहे.
खोची हे गाव सात हजार लोकवस्तीचे आहे. गाव पूरग्रस्त असून येथे स्थानिक सुयोग जाधव हे बाह्य स्त्रोत वायरमन म्हणून विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी सेवेत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची अन्य ठिकाणी बदली केली आहे. बदलीमुळे रात्री, अपरात्री, आपत्कालीन वेळेत वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. जाधव यांची बदली रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com