एसटी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
एसटी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

एसटी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

sakal_logo
By

01742
ओमकार पेंढुरकर

कळंबा एसटी अपघातातील
जखमी युवकाचा मृत्यू

कळंबा, ता. १७ ः कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर कळंबा तलावानजीक रस्ता ओलांडताना एसटी अपघातामध्ये जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ओमकार पेंढुरकर (वय 22, रा. आळते, ता. हातकलंगले) असे त्याचे नाव आहे. गुरुवार (ता.15) रात्री पावणेआठच्या सुमारास हा अपघात झाला होता. याच ओमकारचा मित्र कबीर शिंदे याचा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ओमकार व कबीर आपल्या मित्रासमवेत कळंबा येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. लघुशंका करण्यासाठी दोघे राज्य महामार्ग ओलांडत होते. मात्र, कोल्हापूर मार्गे मुरगुडकडे जाणाऱ्या एसटीने या दोघांना अचानक जोरदार धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यामध्ये गुरुवारी रात्री दहा वाजता कबीरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असणाऱ्या ओमकारचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला.ओमकार अविवाहित असून, तो मार्केटिंग करत होता. तो एकुलता एक असून, त्याच्यापश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे