मिनी कोल्हापूरमध्ये सुसज्ज भाजी मंडई कधी होणार

मिनी कोल्हापूरमध्ये सुसज्ज भाजी मंडई कधी होणार

01992, 01994


कळंब्यात हवा भाजी मंडई
रस्त्यावरच विक्री : मूलभूत सुविधांची गरज

संजय दाभाडे ः सकाळ वृत्तसेवा

कळंबा; ता. ६ ः मिनी कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम भाग उपनगरामध्ये सुसज्ज भाजी मंडई उपलब्ध नसल्यामुळे फुटपाथ, मोकळ्या जागा व मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी विक्री करण्यासाठी शेतकरी विक्रेते बसत आहेत. या विक्रेत्यांना पिण्याच्या पाण्याची व शौचालयांची सुविधा नसल्यामुळे कुचंबणा होत आहे. पाऊस व उन्हात शेतकऱ्यांचे हाल असून शेतीमालाचेही नुकसान होत आहे. ग्राहक रस्त्यावरच वाहन लावून भाजी खरेदी करत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताच्या घटना घडत असतात.
कळंबा पश्चिम भाग उपनगराचा विस्तार झपाट्याने होत आहे. ७९ आणि ८० या दोन प्रभागांचा समावेश या उपनगरामध्ये होत असून २० हजारांवर लोकसंख्या आहे. हॉटेल व्यवसाय व घरगुती खानावळीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे दररोज भाजीपाल्याची विक्री मोठी होते. येथे कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी,गिरगाव, पिरवाडी, वाशी, नंदवाळसह अनेक गावांतून शेतकरी व विक्रेते पालेभाजी, फुले, दुग्धजन्य पदार्थ घेऊन विक्रीसाठी येतात. कर्नाटकातील संकेश्वर, गोकाकमधूनही भाजीविक्रेते येतात. भाजी विक्रीतून दररोज उलाढाल होत असते. मात्र शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी बाजार कट्टे किंवा भाजी मंडई नसल्यामुळे मिळेल तेथे ते बसतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होत आहे. येथे महानगरपालिकेने निधी देऊन उपनगरात सुसज्ज भाजी मंडई बांधण्याची गरज आहे. येथे परिसरात मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामध्ये नवीन लेआउट होण्याची शक्यता आहे.

चौकट..
परिसरात हॉटेल्स, घरगुती खानावळ आहेत. खाद्यपदार्थाचे स्टॉल तर ५० वर आहेत. २० हून अधिक मंगल कार्यालय, ऍग्रो टुरिझम आहेत. त्यामुळे त्यामुळे भाजीपाल्यासह दूध, दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तत्काळ व मुबलक ताजी भाजी मिळत असल्यामुळे व्यावसायिक व ग्राहक भाजी खरेदीसाठी प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
....
01990
पश्चिम भाग उपनगरात नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील विक्रेते व शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येतात. मंडई नसल्यामुळे रस्त्यावरच मंडई नसल्यामुळे विकतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. खुल्या जागेत महापालिकेने मंडई बांधावी.
- यशवंत शिंदे, माजी परिवहन समिती सदस्य
...........
01988
उपनगराच्या ग्रामीण भागातून केएमटी व खासगी वाहनांतून शेतकरी भाजी विक्रीसाठी येतात. शेतकरी व महिला भगिनींना पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सुविधा नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होते. भाजी मंडई किंवा बाजार कट्टे महापालिकेने बांधले तर सर्वांना सोयीस्कर होईल.
- संजय आकोळकर, रिक्षा व किराणा व्यवसायिक
........
01991
शहरापेक्षा स्वस्त भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थ मिळत असल्यामुळे हॉटेल व्यवसाय, मंगल कार्यालय व निवासी शाळांत मागणी वाढत आहे. मात्र शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी व्यवस्थित जागा व मंडई उपलब्ध नसल्यामुळे मिळेल तेथे ते भाजी विक्री करतात.
- संतोष सलगर
.......
01986
दररोज ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमधून शेतकऱ्यांना मोठ्या ऑर्डरी मिळत आहेत. मात्र शेतीमाल ठेवण्यासाठी व विक्रीसाठी मंडई नसल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरूनच भाजीपाला वितरण करावे लागते.
- युवराज पाटील
.......

01987
घराजवळच ताजी भाजी उपलब्ध होत असल्यामुळे महिलांना शहरात जावे लागत नाही. परंतु भाजी मंडई नसल्यामुळे मर्यादित वेळेतच विक्रेते व शेतकरी भाजी विक्रीसाठी येतात. महापालिकेने आरक्षित जागेवर भाजी मंडई बांधावी. शेतकऱ्यांसाठी सुविधा द्याव्यात
- अनिता चव्हाण, गृहिणी व दूध उत्पादक
..
बापूरामनगर : येथे व फूटपाथवर भाजी विक्रीसाठी बसलेले व्यावसायिक व शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com