कळंब्यात सेंद्रिय खत प्रकल्प

कळंब्यात सेंद्रिय खत प्रकल्प

84145
कळंब्यात होणार सेंद्रिय खत प्रकल्प
जिल्हा परिषदेची मंजुरी; २५ लाख निधी, कचऱ्याची विल्हेवाट

सकाळ वृत्तसेवा

कळंबा, ता. १६ ः कळंब्यातील कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी २५ लाखांच्या खर्चातून सेंद्रिय खत प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तत्त्वतः मंजुरी देऊन हिरवा कंदील दाखवला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतर गावांतही अशी कार्यवाही होईल.
दरम्यान प्रकल्प उभारणीसाठी व मशिनरी खरेदीसाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. कळंबा ग्रामपंचायत व अवनी संस्था यांच्या पुढाकारातून स्मशानभूमीनजीक प्रकल्प होईल. त्यामुळे गावातून दैनंदिन संकलित ओल्या कचऱ्यातून शंभर किलोहून अधिक सेंद्रिय खत निर्माण होणार आहे. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून रस्ते, ऑइल निर्मितीसाठी पाठवण्यात येणार आहे. कळंब्यात दररोज आठशे किलोहून अधिक कचरा संकलित होतो. ट्रॅक्टर ट्रॉली व टिप्परद्वारे आरोग्य कर्मचारी ओल्या, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कळंबा तलावानजीक आणून टाकतात. कचऱ्यावर प्रक्रियेसाठी यंत्रसामुग्री व पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांसह डास, माशा, दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अज्ञातांकडून कचरा पेटवल्यामुळे आगीचे व धुराचे लोट हवेत पसरून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जलसाठ्यालाही बाधा पोहोचत आहे. यासाठी कळंबा ग्रामपंचायतीने जानेवारीत २५ लाख तरतुदीचा प्रस्ताव पाठवला होता. मार्चमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने तत्त्वतः मंजुरी देऊन व निधीची तरतूद करून ग्रामपंचायतीकडे पाठवला. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे प्रकल्प उभारणीचे काम थांबले आहे.

चौकट
योग्य किमतीत मिळणार खत
दरम्यान कचरा प्रकल्प नावीन्यपूर्ण असून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व नागरिकांना बगीच्यासाठी खताचा उपयोग करता येईल. प्रशासनाकडून सेंद्रिय खताची किंमत ठरवून शेतकऱ्यांना व नागरिकांना वितरित केले जाईल.

कोट
कळंब्यात दैनंदिन संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी अद्ययावत मशिनरी खरेदी केली जाणार आहे. अवनी संस्थेची चर्चा सुरू असून आचारसंहिता संपल्यानंतर कार्यवाही सुरू केली जाणार आहे
- दिलीप तेलवी, ग्रामविकास अधिकारी

चौकट...
कळंब्यातील कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू होईल. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल.
- सुमन गुरव, सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com