
कै. प्रदीप पाटील (बाबा) कर्मचारी क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाष जद तर व्हा. चेअरमनपदी डॉ. मिलींद गोडबोले याची निवड
02524, 02523
सुभाष जद अध्यक्षपदी
कोडोली : येथील कै. प्रदीप पाटील (बाबा) प्रणित यशवंत शिक्षणसमूह कर्मचारी क्रेडिट को- ऑप. सोसायटी मर्या., संस्थेच्या चेअरमनपदी सुभाष विलास जद तर व्हा. चेअरमनपदी डॉ. मिलींद मोहन गोडबोले याची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी सुभाष जद व व्हा. चेअरमनपदी डॉ. मिलींद गोडबोले यांची निवड झाली. नवनियुक्त संचालक ः पुंडलिक पाटील, अरविंद पोवार, मंदार पसरणीकर, राजेश पाटील, विजय चव्हाण, शहाजी मोहिते, भरत पाटील, उमेश जाधव, डॉ. उत्तमवंडे, दादासो टिंगरे, माधुरी खामकर, ग्रेस गायकवाड, अश्विनी पवार. नूतन पदाधिकारी व संचालकांना यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मजा पाटील, सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त विनीता पाटीलसह सभासदांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.