जोतिबा देवाला येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

जोतिबा देवाला येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
Published on

04348
जोतिबा डोंगरावर आरोग्य तपासणी
कोडोली : येथील यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल, कोडोली व यशस्वी फाउंडेशन, कोडोली यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर येणाऱ्या सातशेहून अधिक भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जोतिबा डोंगरावर सेंट्रल प्लाझा येथी हॉस्पिटलमार्फत भाविकांची आरोग्य तपासणी करून गरजेनुसार औषधोपचार करण्यात आला. सेवा अखंड चोवीस तास सुरू होती. याचा सातशेहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य डॉ. जयंत पाटील, यशस्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष विनिता पाटील त्यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरासाठी हॉस्पिटल अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले, डॉ. लक्ष्मीकांत पाटील, डॉ. हर्षल साबळे, डॉ. अभिजीत इंगवले, डॉ. वसुंधरा बोराखडे, डॉ. आद्रा थोरात, बापूसो बच्चे, सागर पाटील, सुरेश बामणे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com