
दारवाड शाळेत पाद्य पूजन उपक्रम संपन्न.
04136
दारवाड : येथे विद्यामंदिर शाळेत पाद्यपूजनप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व पालक.
दारवाड विद्यामंदिरात पाद्यपूजन
कोनवडे : विद्यामंदिर दारवाड (ता. भुदरगड) येथे पाद्यपूजनाचा उपक्रम झाला. सिद्धगिरी कणेरीमठ व विद्यामंदिर शाळेतर्फे माता व पित्यांच्या पाद्यपूजन झाले. अध्यक्षस्थानी सरपंच शामराव मोहिते होते. दत्ता पाटील यांनी पाद्यपूजनाचे मह सांगितले. विद्यार्थ्यांनी पालकांच्या चरणाचे पूजन करून आशीर्वाद घेतले व माता-पित्यांना गोड घास भरवत मायेची मिठी मारली. यावेळी वातावरण हृदयस्पर्शी झाले. सूत्रसंचालन सचिन भोसले, प्रास्ताविक नारायण आगम यांनी केले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, मोहन भारमल, चंद्रकांत मोहिते, लता मोरे, मुख्याध्यापक अशोक कौलवकर, ग्रा.पं. सदस्य, शिवाजी देसाई, विद्या कुलकर्णी, माधुरी देसाई, आशाताई कुंभार, ज्योती देसाई, पांडुरंग पाटील, शहाजी मोहिते, शिवाजी चौगले उपस्थित होते.