
तरुणानो शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा- प्रा नितीन बानूगडे पाटील.
04226
‘यश मिळत नाही तोपर्यंत लढा’
कोनवडे : वेडं झाल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि कारणे देणारे लोक यशस्वी होत नाहीत. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढा. तरुणांनो शिवरायांचे विचार आचरणात आणा, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. ते टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे छावा प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र पाटील होते. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपसरपंच वैशाली गायकवाड, पोलिसपाटील नेताजी गुरव, ग्रापं सदस्य बाळासो मिटके, आप्पासो देसाई, अर्जुन कुंभार, सरिता कुंभार, के. एम. देसाई छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश आसबे, निखिल डौर, पवन पाटील, संदीप पाटील, अनिल जांभळे, सुरज देसाई, बाळासो रामाणे, अर्जुन कुंभार, सुरेश देसाई, अंबादास दैसाई, छावा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. डॉ. अरुण नलवडे यांनी सूत्रसंचलन तर प्रा. विश्वंभर कुलकर्णी यांनी आभार मानले.