खतांच्या वाढत्या किमतीने शेती तोट्यात

खतांच्या वाढत्या किमतीने शेती तोट्यात

खतांचा संग्रहित फोटो वापरावा...
..........
खतांच्या वाढत्या किमतीने शेती तोट्यात

लिंकिंग खत विक्रीने शेतकरी मेटाकुटीला; कंपन्यांवर चाप लावण्याची गरज

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. १० : अनिश्चित वातावरण, वाढती मजुरी, वन्यप्राण्यांचा सततचा उपद्रव अशातच रासायनिक खतांच्या किमतीही दोन हजारांच्या घरात गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी शेती तोट्याची बनली आहे. बदलत्या हवामानाने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच लिंकिंग खत विक्रीने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
खत उत्पादक कंपन्यांनी मनमानी करत रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालणे अवघड बनले आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने पिके कशी घ्यायची आणि उत्पादन कसे काढायचे, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेतीची मशागत करून पिकांची व उत्पादनाची वाढ व्हावी, यासाठी शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो. पेरणीवेळी खतांची टंचाई निर्माण होईल, असे गृहीत धरून बँक व सेवा सोसायटीकडून कर्ज घेऊन रासायनिक खते खरेदी केली जातात. खतांच्या किमती वाढल्याने कर्जातही वाढ करावी लागत आहे. त्यामुळे व्याजाचा बोजाही शेतकऱ्यांच्या डोक्यावर पडत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय नकोच, अशी मानसिकता वाढू लागली आहे. मात्र, नाइलाजास्तव शेती करावी लागत आहे. शासनाने रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात आणि खत कंपन्यांच्या मनमानीला चाप लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
....
चौकट...
खतांचे दर असे
सुफला ः १४७० रु.
१०२६२६ : १४७० रु.
डीएपी : १३५० रु.
एमओपी : १७०० रु.
युरिया : २६६ रु.
सुपर फॉस्पेट : ६०० रु.
---
चौकट :
खत कंपन्यांची मनमानी
खतांच्या लिंकिंगच्या मनमानीबाबत अनेक बैठका झाल्या; पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.. असे करत २०१५ पासून नऊ वर्षे खासगी खतनिर्मिती कंपन्यांची मनमानी सुरू आहे. या कंपन्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च वाढल्याने मोबदल्यात घट झाली आहे. त्यातच लिंकिंग देऊन खतनिर्मिती कंपन्या नको असणारी खते व इतर औषधे माथी मारत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com