फयेची सुरक्षा राम भरोसे : पाटबंदारेचे दुर्लक्ष : नागरिकांतुन नाराजी.

फयेची सुरक्षा राम भरोसे : पाटबंदारेचे दुर्लक्ष : नागरिकांतुन नाराजी.

05721

फये प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे
पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष ; नागरिकांत नाराजी

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा

कोनवडे, ता. २ : भुदरगड तालुक्यातील प्रमुख प्रकल्पापैकी एक व विपुल निसर्गसौंदर्याने नटलेल्या फये प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फये प्रकल्प परिसरात ‘रेस्ट हाऊस’ संस्कृती वाढल्याने हुल्लडबाजी वाढली आहे. गारगोटीपासून प्रकल्प १२ ते १५ किलोमीटर अंतरावर असल्याने कोणीही अधिकारी इकडे फिरकत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. फये प्रकल्पाच्या सुरक्षेकडे पाटबंधारे विभाग कधी गांभीर्याने पाहणार, अशी विचारणा होत आहे.
हा परिसर पिकनिक पॉईंट म्हणून परिचित आहे. शासनाच्या इको सेन्सिटिव्ह झोन आरक्षित व निसर्गरम्य परिसर, निरव शांतता, जैवविविधता असणारा हा परिसर असल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटक, पार्ट्या, हुल्लडबाजी, अश्लील प्रकार वाढल्याने परिसर असुरक्षित बनला आहे. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाकडे कानाडोळा केल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. भुदरगड तालुक्यातील फये, हेदवडे खोऱ्यातील अनेक गावांना वरदान ठरलेला फये प्रकल्पच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असुरक्षित बनला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायमस्वरूपी कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेटची गळती काढण्यासाठी १ कोटी ९० लाखांचा निधी उपलब्ध केला व गेटची गळती काही प्रमाणात थांबली; पण क्वार्टसाईट खडकातून लागलेल्या गळतीचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाच्या सिंचन विमोचकाच्या बाजूने लागलेल्या गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने घ्यावे; अशी मागणी होत आहे.
---
चौकट :
अंतरच दुर्लक्षाचे कारण
फये प्रकल्पाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी गारगोटीपासून १२ ते १५ किलोमीटर अंतर जावे लागते, या कारणास्तव प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इकडे कोणीही फिरकत नसल्याचे नागरिक सांगतात.

गळतीचे ग्रहण सुटणार कधी?
पाटबंधारेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून फये प्रकल्पाच्या गळतीचा विषय चर्चेत आहे. क्वार्टसाईट खडकातून लागलेल्या गळतीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. गळतीचे ग्रहण कधी सुटणार, हा एकमेव प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com