रक्ताच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचे नाते जागृत ठेवा : आमदार आबिटकर : माजी विद्यार्थी मेळावा.

रक्ताच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचे नाते जागृत ठेवा : आमदार आबिटकर : माजी विद्यार्थी मेळावा.

05723
मित्रत्वाचे नाते सर्वश्रेष्ठ
आमदार प्रकाश आबिटकर; कूरला माजी विद्यार्थी मेळावा

सकाळ वृत्तसेवा

कोनवडे, ता. २ : संगणकाच्या युगात नाती दुरावत आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात आपुलकीची भावना जागृत ठेवा, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते कूर (ता. भुदरगड) येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते.
कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटीच्या बॅच १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांनी मेळावा आयोजित केला होता. आमदार आबिटकर त्या बॅचचे विद्यार्थी. १९ वर्षांनंतर शेती, नोकरी, उद्योग व्यवसाय सांभाळून मुंबई, पुणे, कोल्हापूरला असणाऱ्यांनी मेळाव्यास उपस्थिती लावली. आमदार आबिटकर यांचा वर्गमित्रांतर्फे सत्कार झाला. यावेळी मनीष पाटील, माजी उपसभापती अजित देसाई, वजीर मकानदार, विलास इंगळे, अरुण मोरे, कृष्णात कुपटे, नामदेव पाटील, संजय पाटील, सतीश टोणपे, बाजीराव मिसाळ, बजरंग देसाई, रविकिरण जोशी, सुनीता धोंगडे, जयश्री टिकारे, अलका साळोखे, माधुरी शिंदे, गिता शिंदे, अरुणा नागटिळे, रेखा आबिटकर, संगीता भाट यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण मोरे यांनी तर मनीष पाटील यांनी आभार मानले.
---
चौकट
वर्गमित्रासोबत सेल्फीचा मोह
स्नेहमेळानिमित्त आमदार प्रकाश आबिटकर यांनी मित्रांसोबत गप्पा-गोष्टी करत एकमेकांची विचारपूस केली. कार्यक्रमाला आमदार आबिटकर उपस्थित राहिल्याने सर्वांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com