‘फये’ बंधाऱ्यांत दरवर्षी लाखो रुपये पाण्यात

‘फये’ बंधाऱ्यांत दरवर्षी लाखो रुपये पाण्यात

05725, 05726
भाटिवडे (ता. भुदरगड) ः पाणीसाठा होत नसल्याने येथील निकृष्ट बनलेला बंधारा. दुसऱ्या छायाचित्रात शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी मारलेले खड्डे. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा)
.....
‘फये’ बंधाऱ्यांत दरवर्षी लाखो रुपये पाण्यात

गळतीमुळे पाणीसाठा होत नसल्याने पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ४ : लाखो रुपये खर्चूनही गळती थांबत नसल्याने भुदरगड तालुक्यातील फये लघु पाटबंधारे प्रकल्पातील बंधाऱ्यांत गेली अनेक वर्षे पाणीसाठा होत नाही. पाणी साठवणूक होत नसल्याने आवर्तन वगळता अन्य वेळी पिके वाळून जातात. दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही पाणीसाठा होत नसल्याने बांधाऱ्यात पाणीसाठा होणार कधी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
तालुक्यातील मोरओहळ नाल्यावर फये येथे ३०.५० मीटर उंची व ११३९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असणाऱ्या या प्रकल्पास १९९६ मध्ये मंजुरी मिळाली. प्रकल्पांतर्गत एकूण १२ बंधाऱ्यांचा समावेश असून, लाभक्षेत्रात ७०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येते. एकूण १२ पैकी ८ बंधारे प्रकल्प बांधकामावेळचे आहेत. या बंधाऱ्यांचे काम निकृष्ट झाले आहे. हेदवडेपासून भाटिवडेपर्यंत आठ बांधाऱ्यांतून मोठी गळती सुरू असून, बंधाऱ्यामध्ये पाणी साठवणूक होत नाही. पाणी साठवणूक होत नसल्याने पिके धोक्यात येतात. शेतकऱ्यांना स्वतः खर्च करून खड्डे मारून पिके वाचवावी लागतात. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने २०१६-१७ मध्ये २१ लाखांचा निधी देऊन यातून सात बंधाऱ्यांची दुरुस्ती केली. दरवर्षी दुरुस्त केलेल्या बांधाऱ्यात पाणीसाठा होत नसून शासनाने दुरुस्तीसाठी खर्च केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात गेल्याने परिसरातील शेतकरी संतप्त आहेत. दरवर्षी शासन खर्च करते, पण गळतीचे दुखणे कायमचे आहे.
प्रकल्पाच्या पाण्याच्या आशेवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकांना बंधाऱ्यांच्या गळतीमुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. पिके वाळून जात असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावे लागते. बंधाऱ्यांची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
......
कोट...
फये प्रकल्पाअंतर्गत येणारे बंधारे निकृष्ट दर्जाचे असून, त्यामध्ये पाणीसाठा होत नाही. परिणामी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
आर. के. पाटील, सचिव, फये धरण कृती समिती
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com