
आजऱ्यात चराटी, आमणगी यांचा सत्कार
ajr311.jpg
72359
आजरा ः येथे उत्तूरचे सरपंच किरण आमणगी यांचा सत्कार करताना शिवाजी बिद्रे. या वेळी डॉ. शिवशंकर उपासे आदी.
-------
आजऱ्यात चराटी, आमणगी यांचा सत्कार
आजरा, ता. १ : येथील शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था, चैतन्य सृजन व सेवा संस्था आणि विद्यावर्धिनी पतसंस्थेतर्फे जिल्हा नियोजन समितीवर शासकीय प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा सत्कार झाला.
जे. पी. नाईक संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांच्याहस्ते चराटी यांचा सत्कार झाला. उत्तूरच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल किरण आमणगी यांचा संस्थेचे संचालक शिवाजी बिद्रे यांच्याहस्ते सत्कार झाला. आजरा तालुका सूतगिरणीच्या तज्ज्ञ संचालकपदी अनिकेत चराटी यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य संस्थेचे उपाध्यक्ष सुनील सुतार यांच्याहस्ते सत्कार झाला. त्यांचा सत्कार विद्यावर्धिनी, संकल्प गृहतारण संस्था आणि अक्षर मुद्रण औद्योगिक संस्थेतर्फे केला. श्री. चराटी व श्री. आमणगी यांनी मनोगत व्यक्त केले. जे. पी. नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष विभूते यांनी स्वागत, सूत्रसंचालन करून आभार मानले.