मुत्नाळ शाळेचा क्रीडामहोत्सव
gad11.jpg
72382
मुत्नाळ : एस. डी. हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करताना सी. बी. कानडे. विलास शिंदे, सचिन मगदूम आदी.
मुत्नाळ शाळेचा क्रीडामहोत्सव
गडहिंग्लज : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील एस. डी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. माजी राष्ट्रीय खेळाडू सी. बी. कानडे यांच्याहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. लक्ष्मी संभोजी हिने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. श्री. कानडे यांनी सरावातील सातत्यातूनच चांगले खेळाडू घडत असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक विलास शिंदे आदी उपस्थित होते. क्रीडा विभागप्रमुख सचिन मगदूम यांनी स्वागत केले. पार्वती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक मनोहर गुलगुंजी यांनी आभार मानले.
--------------------------
क्रिएटीटिव्हमध्ये भरली बाजारपेठ
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठ भरवली. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह विविध वस्तूंचे स्टॉल उभारले होते. व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवला होता. विद्यार्थ्यांनी वस्तूंच्या विक्रीचा अनुभव घेतला. शिक्षक, पालकांनी बाजारपेठेतून वस्तूंची खरेदी केली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव आण्णासाहेब बेळगुद्री, मुख्याध्यापक दिनकर रायकर, सविता बेळगुद्री उपस्थित होते. लक्ष्मी कदम व स्नेहा खमलेट्टी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.
---------------------------
gad12.jpg
72383
गडहिंग्लज : जनता गृहतारण संस्थेतर्फे डॉ. संभाजी भांबर यांचा सत्कार करताना मारुती मोरे. शेजारी सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे, प्रकाश पोवार, प्रा. शिवाजी भुकेले आदी.
‘जनता गृहतारण’ तर्फे संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : जनता गृहतारण संस्थेच्या येथील शाखेतर्फे सत्कार व निवड पत्र प्रदान कार्यक्रम झाला. नेसरी येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संभाजी भांबर यांचा सत्कार केला. तसेच प्रा. शिवाजी भुकेले यांना मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र, राजेंद्र चव्हाण व सचिन देसाई यांना गडहिंग्लज तालुका उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र, प्रकाश पोवार यांना सरचिटणीसपदी निवडीचे पत्र प्रदान केले. जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे यांच्याहस्ते निवडपत्रे दिली. शाखाध्यक्ष प्रकाश पोवार यांनी स्वागत केले. पंडित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण चौगुले यांनी आभार मानले.
----------------------------
gad13.jpg :
72384
ममता पाटील
ममता पाटील प्रथम
गडहिंग्लज : मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सौ. वसुमता नौकूडकर हायस्कूलची विद्यार्थिनी ममता पाटील हिने विभागीय मैदानी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. २०० मीटर व ४०० मीटर धावणे प्रकारात तिने हे यश मिळवले. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. मुख्याध्यापक ए. सी. देशमाने, क्रीडा शिक्षक व्ही. एम. होडगे, सहायक शिक्षिका सौ. व्ही. आर. माने यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------------------------
GAD14.JPG
72385
गडहिंग्लज : महेश पाटणे यांनी वाढदिवसानिमित्त होप फौंडेशनच्या डोनेशन बॉक्समधून एचआयव्ही बाधित मुलांसाठी देणगी गोळा केली.
वाढदिवसानिमित्त एचआयव्ही बाधितांना मदत
गडहिंग्लज : येथील महेश पाटणे यांनी वाढदिवसानिमित्त एचआयव्हीबाधित मुलांना मदत दिली. वाढदिवसानिमित्त अनेक लोक शुभेच्छा देण्यासाठी येतात. हे लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी होप फाउंडेशनचा डोनेशन बॉक्स ठेवला होता. होपमार्फत १६० एचआयव्ही बाधित मुलांची जबाबदारी घेतली आहे. डोनेशन बॉक्समध्ये जमा झालेल्या रकमेतून मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. सुज्ञान पाटणे, वृषभ पाटणे, नेहा राजमाने, अक्षय पाटणे, कल्याणी गाताडे, मेघा पाटणे, योगेश गाताडे, प्रसाद बोरगावे यांनी गरजू एचआयव्ही बाधित मुलांसाठी धान्य दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.