Sun, Jan 29, 2023

पेरणोलीची कुरकुंदेश्वर देवाची यात्रा उत्साहात
पेरणोलीची कुरकुंदेश्वर देवाची यात्रा उत्साहात
Published on : 1 January 2023, 12:59 pm
पेरणोलीची कुरकुंदेश्वर देवाची यात्रा उत्साहात
आजरा, ता. १ : पेरणोली (ता. आजरा) येथील कुरकुंदेश्वर राईत भरणारी कुरकुंदेश्वर देवाची यात्रा उत्साहात झाली. दरवर्षी ही यात्रा डिसेंबरच्या अखेरीस किंवा नववर्षात जानेवारीत होते. यंदा ही यात्रा काल (ता. ३१) होती. कुरकुंदेश्वर राईत रात्री बाराला गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर धार्मिक विधी पार पडला. आज पहाटे महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादासाठी आजरा तालुक्यासह चंदगड, भुदरगड व गडहिंग्लज तालुक्यांतील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त पेरणोली प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गावातील क्रिकेटचे संघ सहभागी झाले. भाविकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा सादर झाला.