मोफत धान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत धान्य
मोफत धान्य

मोफत धान्य

sakal_logo
By

जिल्ह्यातील २३ लाख
लोकांना मिळणार मोफत धान्य

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ः महिन्याला लागणार १२ हजार ५०० टन धान्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ लाख ५४ हजार ५५ लोकांना आजपासून मोफत धान्य वितरण केले जाणार आहे. यासाठी महिन्याला जिल्ह्यात १२ हजार ५०० टन धान्य वाटप करावे लागणार आहे.
देशातील एकही व्यक्ती उपवासी राहू नये, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार रेशनकार्ड धारकांना ही योजना लागू राहणार आहे. या कार्डवर नोंद असणाऱ्या कुटुंबीयांनाही याचा फायदा होणार आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत २ रुपये किलोप्रमाणे २ किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे ३ किलो तांदूळ दिले जात होते. हेच गहू आणि तांदूळ मोफत दिले जाणार आहे. असे महिन्याला पाच किलो धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही रेशनधान्य दुकानदाराकडून या धान्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत. दरम्यान, जिल्ह्यातील रेशनधान्य दुकानदारांकडूनही याचे चांगल्या पद्धतीने वाटप केले जाणार आहे. मात्र, कार्डधारकांनीही पाच किलो धान्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत, पैसे घेणाऱ्यांबद्दल तहसीलदारांकडे तक्रार देता येणार आहे.
.....

‘१ जानेवारीपासून म्हणजे आजपासून जिल्ह्यातील पात्र रेशनकार्ड धारकांना पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहेत. याचे वेळेत आणि योग्य वाटप व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत.
दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
...