कोवाड-आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-आर्थिक मदत
कोवाड-आर्थिक मदत

कोवाड-आर्थिक मदत

sakal_logo
By

कुदनूरच्या सुतार कुटुंबीयांना ग्रामस्थांची मदत

कोवाड, ता. १ ः कुदनूर (ता. चंदगड) येथे शनिवारी रात्री झालेल्या अग्नितांडवात शशिकांत सुतार व त्यांच्या बंधूंच्या व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. संपूर्ण व्यवसाय आगीत जळून खाक झालेल्या सुतार कुटूंबियांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरपंच संगीता घाटगे यांनी घाटगे कुटुंबाच्या वतीने एक लाखाची मदत जाहीर करून सुतार कुटुंबीयाना मदतीचा हात पुढे केला आहे.
सुतार बंधूंनी आपल्या कलेच्या जोरावर कष्टातून व्यवसायांची उभारणी केली होती. पण शनिवारी राईस मिल, ऑईल मिल, सॉ मिल व फॅब्रिकेशनच्या दुकानाला आग लागली. आगीत सर्वच व्यवसायांची राखरांगोळी झाली. त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरपंच संगीता घाटगे व सुरेश घाटगे यांनी तत्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, सिद्राम रामू गुंडकल यांनी १० हजार व कृष्णा निंगाप्पा मोहनगेकर यांनीही ११ हजारांची आर्थिक मदत जाहीर करून सुतार कुटुंबीयाना आधार दिला. सरपंच व ग्रामस्थांनी संकटसमयी दिलेला मायेचा आधार खूप मोलाचा असल्याने मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत.