मडिलगेत लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडिलगेत लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात
मडिलगेत लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात

मडिलगेत लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात

sakal_logo
By

मडिलगेत लक्ष्मी देवी यात्रा उत्साहात
आजरा, ता. १ ः मडिलगे (ता. आजरा) येथे लक्ष्मीदेवी यात्रा उत्साहात झाली.
गत दोन वर्षात कोरोनाचे निर्बंध पाळत विविध धार्मिक कार्यक्रम झाले होते. यंदा मात्र कोरोनाचे नियम हटल्याने यात्रेमध्ये उत्साह व चैतन्य होते. भाविकांनी गर्दी केली होती. लक्ष्मीदेवी रात्री खेळवली. पहाटे लक्ष्मीची प्रतिष्ठापणा झाली. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम व ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला.
यात्रेनिमित्त तीन दिवस कबड्डी स्पर्धा झाल्या. कोल्हापूर असोसिएशन नोंदणीकृत जिल्ह्यातील नामांकित संघ सहभागी झाले होते. ७० किलो वजनी गटात मावळा (सडोली खालसा), शिवमुद्रा (कौलव), हिरण्यकेशी (आजरा), केदारी रेडेकर (महागाव) या कब्बड्डी संघांनी अनुक्रमे विजेतेपद मिळवले. वैभव रमाडे (कौलव) अष्टपैलू खेळाडू, संकेत चव्हाण (सडोली) उत्कृष्ट चढाई, प्रताप कुंभार (सडोली) उत्कृष्ट पकड यांचा गौरव झाला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. जीवन निकम, नाना सुतार, शिवाजी बोलके, बशीर सय्यद यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजय परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले.