नंगीवल्ली चौकात तरुणांच्यात राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंगीवल्ली चौकात तरुणांच्यात राडा
नंगीवल्ली चौकात तरुणांच्यात राडा

नंगीवल्ली चौकात तरुणांच्यात राडा

sakal_logo
By

नंगीवली चौकात
वर्चस्ववादातून चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १ ः वर्चस्ववादातून नंगीवली चौकात झालेल्या मारहाणीत दोघांवर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोष सुभाष रेवणकर (वय २७) आणि आसिफ मुल्ला (दोघे रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ) हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी संजय जमादार, रामू मुंडेकर आणि महेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (ता.३०) रात्री ही घटना घडली. याबाबतची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारे वसाहत आणि नंगीवली चौकातील काही तरुणांच्यात वर्चस्ववादातून वाद सुरू होता. यातून संतोष रेवणकर आणि आसिफ मुल्ला हे दोघे नंगीवली चौकात आले असता रामू मुंडेकर याने चाकूने या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात रेवणकर याच्या छातीवर आणि हातावर वार झाले, तर मुल्ला याच्या पाठीवर वार करण्यात आला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप संशयित तिघांना अटक करण्यात आली नसून त्यांचा शोध सुरू आहे.