एज्युकेशनल पत्रके प्रचंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एज्युकेशनल पत्रके प्रचंड
एज्युकेशनल पत्रके प्रचंड

एज्युकेशनल पत्रके प्रचंड

sakal_logo
By

फोटो72515 ओव्‍हरसेट

गुजराती हायस्कूलच्या
१९६८ बॅचचा स्नेहमेळावा

कोल्हापूरः गुजराती मित्र मंडळ संचलित, गुजराती हायस्कूल शाहूपुरी येथे शिकलेल्या १९६८ मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा गुजराती हायस्कूल येथे नुकताच पार पडला. सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. तब्बल ५४ वर्षांनंतर जमलेल्या सर्व जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटत पुनश्च गप्पांचा फड रंगवला गेला. सर्वांनी सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. कार्यक्रमाचे आयोजन महेंद्रभाई दलाल, नरेंद्रभाई मेहता, जयंतीभाई रांभिया, शर्मिष्ठा बेन आदींनी केले.
-----

विद्यापीठ हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात ६ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात स्मार्ट फायर अलार्म सिस्टीम, लेझर सिक्युरिटी सिस्टम, कचरा व्यवस्थापन, अग्निसचूक यंत्र, फायर अलार्म, ३० होलोग्रामसह १०० उपकरणाची मांडणी केली. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांनी उद्‌घाटन केले. सर्व विज्ञान शिक्षकांचे प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
...
जनस्वास्थ्य दक्षता अभियानाला प्रारंभ
कोल्हापूर : जिल्हा दक्षता समितीमार्फत जनस्वास्थ दक्षता अभियानाची सुरूवात विद्यापीठ हायस्कूलमधून झाली. जनस्वास्थ दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांच्या उपस्थितीत आणि मुख्याध्यापक बी. डी. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. अभियानात प्रार्थनेवेळी जनस्वास्थ्याची प्रतिज्ञा घेतली. व्यसनाविरोधी, आरोग्य, पर्यावरण यावर पोस्टर स्पर्धा घेतली. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम गुळवणी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...
विद्यापीठ हायस्कूलमध्ये मातृदिन
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलमध्ये मातृदिन झाला. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार अध्यक्षस्थानी होते. जे. डी. कुंभार यांनी आईच्या वात्सल्याबाबत माहिती दिली. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम गुळवणी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...
72661
अनिकेत करवते यांची निवड
कोल्हापूर : गोकूळ शिरगांव येथील अनिकेत करवते यांची जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटीत कामगार विभागाच्या करवीर तालुकाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष नितीन मस्के यांनी निवडीचे पत्र दिले. आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.
...
72662
निवास सडोलीकर यांची निवड
कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील निवास सडोलीकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या (गवई गट) कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे (कुरुकलीकर), जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे (सरवडे) यांनी निवडीचे पत्र दिले.
...
72676
कोल्हापूर : ट्रस्टतर्फे विश्वस्त श्रीमती अनुराधा तेंडूलकर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करताना.

दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मदत
कोल्हापूर : दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या निधीतून संस्थेच्या नियमानुसार गरीब, गरजू रुग्णांकरिता विविध आजारांवर उपचारांसाठी मदत केली जाते. डायलेसीस, किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या रुग्णांना औषधोपचारासाठी दरमहा मदत केली जाते. या रुग्णांनी ट्रस्टने मान्यताप्राप्त केलेल्या रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे. ट्रस्टतर्फे अशा मदतीचा सध्या १२ रुग्ण लाभ घेत आहेत. याकरीता रुग्णांना उपचारांकरीता मदतीचे धनादेश ट्रस्टतर्फे विश्वस्त अनुराधा तेंडूलकर, शशिकांत प्रभू, डॉ. अरविंद मांजरेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.