कांबळेंच्या ‘परिवर्तन’ कादंबरीचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांबळेंच्या ‘परिवर्तन’ कादंबरीचे प्रकाशन
कांबळेंच्या ‘परिवर्तन’ कादंबरीचे प्रकाशन

कांबळेंच्या ‘परिवर्तन’ कादंबरीचे प्रकाशन

sakal_logo
By

72646
गडहिंग्लज : प्रकाश कांबळे यांच्या पुस्तक प्रकाशनप्रसंगी राजाभाऊ शिरगुप्पे, डॉ. शेखर गायकवाड, संपत देसाई, बापू म्हेत्री, राजन पेडणेकर, प्रा. किसन कुराडे, बाळेश नाईक आदी.

कांबळेंच्या ‘परिवर्तन’ कादंबरीचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील दलित महासंघाचे पदाधिकारी प्रकाश कांबळे यांच्या ‘परिवर्तन’ या देवदासी प्रथा व जाती व्यवस्थेवर आंबेडकरी विचारांचा प्रहार करणाऱ्या कादंबरीचे प्रकाशन प्रा. डॉ. शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे अध्यक्षस्थानी होते. परिवर्तन हा समाजाचा ध्यास व श्‍वास असून साहित्य हे समाज परिवर्तनाचे दुधारी शस्त्र असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगावच्या शूरवीरांना अभिवादन केले. शिरगुप्पे, प्रा. किसन कुराडे, संपत देसाई, राजन पेडणेकर, बापू म्हेत्री, पी. डी. पाटील, रेश्मा कांबळे, प्रा. प्रकाश नाईक यांची भाषणे झाली. लेखक प्रकाश कांबळे यांनी स्वागत, तर सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले. बाळेश नाईक, अरविंद बारदेसकर, साताप्पा कांबळे, परशुराम कांबळे, महेश सलवादे, संदीप कागवाडे, रमजान अत्तार, एस. आर. कांबळे उपस्थित होते.