Wed, Feb 8, 2023

गुंठेवारीसाठी कॅम्प
गुंठेवारीसाठी कॅम्प
Published on : 2 January 2023, 4:10 am
गुंठेवारी विकास परवानगीसाठी
दोन दिवसीय विशेष कॅम्प
कोल्हापूर, ता. २ : शहरातील दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण प्रकरणांसाठी गुरूवार व शुक्रवारी (ता. ५, ६) नगररचना विभागामार्फत दोन दिवसांच्या विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध प्रकारची बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार सकाळी १० ते सायंकाळी ६ वेळेत कॅम्प घेतला जाणार आहे. ५ व ६ जानेवारीला राजारामपुरी विभागीय कार्यालयातील नगररचना विभागात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदार, मिळकतधारक व आर्किटेक्ट, इंजिनिअर यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.