बिग स्टोरी...पंचगंगा प्रदुषणमूक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिग स्टोरी...पंचगंगा प्रदुषणमूक्ती
बिग स्टोरी...पंचगंगा प्रदुषणमूक्ती

बिग स्टोरी...पंचगंगा प्रदुषणमूक्ती

sakal_logo
By

बिग स्टोरी...
सुनील पाटील

पंचगंगा प्रदुषण प्रश्‍न
तात्पुरते उपाय, कागदोपत्रीच काम
मूळ दुखणे अजूनही कायम

देशात सर्वाधिक प्रदुषित असणाऱ्या दहा नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होतो. पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी कागदोपत्री अनेक योजना राबवल्या आहेत. यापैकी काही योजना जरी प्रत्यक्ष राबवल्या असत्या तरीही पंचगंगा प्रदुषणमुक्त होण्यास मदत झाली असती. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयातील मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीत ग्रामीण भागातून पंचगंगा प्रदुषणमूक्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे ताशेरे ओढले आहेत. राजकीय अनास्था आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदीतील पाण्यात रसायणयुक्त, औद्योगिक, साखर कारखान्यांची रसायणयुक्त मळी किंवा थेट सांडपाणी सोडले जात आहे. तात्पुरते उपाय आणि कागदोपत्री कामकाजामुळे पंचगंगेचे मूळ दुखणे अजूनही संपलेले नाही.

सांडपाणी प्रक्रियासाठी ७ कोटी मंजूर
पंचगंगा नदी तिरावरील उपनद्यांच्याकाठी कोल्हापूर, करवीर, गांधीनगर व हातकणंगले तालुक्यातील नागरी भाग येतो. या भागात १६ ते १७ लाख लोकसंख्या आहे. पंचगंगा प्रदुषणमुक्ती अंतर्गत जिल्ह्यातील १७१ गावांचा समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निधी मंजूर झालेली ९ तर ग्रामीण भागातून सर्वाधिक दुषित किंवा सांडपाणी मिसळणारी ३० अशी एकूण ३९ व उर्वरित १३२ गावांमध्ये मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिल्ह्यातील पाच कल्सस्टरमधील ९ गावांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले आहे. यासाठी अंदाजे ७९ कोटी १ लाख २ हजार लागणार आहे. यापैकी ७ कोटी ११ लाख २ हजार रुपये मंजूर झाले आहेत.करवीर तालुक्यातील कळंबे तर्फे ठाणे, पाचगाव, उचगाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी, हातकणंगले तालुक्यातील कबनूर, चंदूर, तळंदगे या गावांचा समावेश आहे.

हळदी, नृसिंहवाडीसाठी स्वतंत्र प्रस्ताव
हळदी (ता. करवीर) व नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे स्वतंत्र प्रकल्प होण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. जिल्ह्यातील ११ गावांसाठी ८८ कोटी ५५ लाख तर इतर २८ गावांसाठी ८६ कोटी ३८ लाख रुपये खर्चून सांडपाणी प्रकल्प उभारला जाणार आहे. याचे कागदोपत्री नियोजन झाले आहे. प्रत्यक्ष हा निधी कधी मिळणार आणि प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार, हा प्रश्‍नच आहे.

पंचगंगा किंवा उपनद्यांमध्ये दुषित पाणी सोडणाऱ्या उद्या व संस्थांवर महापालिकेकडून कारवाईचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, उद्योगाची १ कोटी ६३ लाखांची बँक हमी जप्त केली आहे. ५९ उद्योग, संस्थांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, १३४ उद्योगांसह इतरांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. कारवाई झाल्यानंतर राजकीय लोकांचा वशिला आणून या कारवाईतून मुक्त होवून पुन्हा प्रदुषण करण्यात पुढाकार घ्यायचा अशीच सध्याची परिस्थिती आहे.


तात्पुरत्या उपाय योजना
तालुका* सांडपाणी नदीत मिसळणाऱ्या गावे* तात्पुरत्या उपाय* पाझर व शेतीसाठी वापर* बंधारा बांधकाम* साखळी वनराई बंधारे* शोषखड्डा* योजनापूर्ण संख्या
करवीर*१७*१०*४*२*३*१*७
हातकणंगले*१०*८*२*२*३*१*२
पन्हाळा*३*२*१*१*०*०*१
राधानगरी*६*६*१*१*२*२*०
शिरोळ*३*२*०*१*१*०*१
एकूण*३९*२८*८*७*९*४*११

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्तावित निधी व गावे
प्रस्तावित काम* आवश्‍यक निधी * कोटी रुपयांमध्ये *देखभाल दुरुस्ती (प्रतिवर्षासाठी)
११ गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प* ८८ कोटी ५५ लाख*८ कोटी २९ लाख
२८ गावांमध्ये सांडपाणी प्रकल्प* ८६ कोटी ३८ लाख* ८ कोटी ६३ लाख
एकूण* १६८ कोटी ९३ लाख* १६ कोटी ९२ लाख रुपये


कोट
पंचगंगा प्रदुषण मूक्तीसाठी अधिकाऱ्यांकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत. विद्यामान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी २००७ मध्ये पंचगंगा प्रदुषणमूक्तीसाठी ११ कोटी रुपये मंजूर केले होते. हा निधी कुठे गेला? त्यातून पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त झाली का? हे अधिकाऱ्यांकडून पाहिले जात नाही. प्रदुषण होते त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले पाहिजे. दुषीत पाणीही शुद्ध करुन पिले जाते अशी उदाहरणे आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना यावर काम करायचे नाही.
- विश्‍वास बालीघाटे, शिरढोण
..
कोट
ध्वनीप्रदुषण होते म्हणून शासनाने साऊंड सिस्टीमवर बंदी घातली. गणेश विसर्जनावेळी मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावणाऱ्यांवर ध्वनी प्रदुषण केले म्हणून कडक कारवाई केली जाते. मात्र, जिल्ह्यात पाणी प्रदुषीत केले म्हणून कोणावरही ठोस कारवाई केली जात नाही. दुषित पाणी पिऊन लोक मरण ओढवून घेत आहेत. याचे कोणालाही गांर्भिय नाही.
-बंडू पाटील, हेरवाड
...