
कॅम्प
घरफाळा लावण्यासाठी
आजपासून विशेष कॅम्प
कोल्हापूर, ता. २ : दोन वर्षात बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र घेतले. पण, ज्या मिळकतींवर अद्यापही कर आकारलेला नाही. त्यांना कर आकारणी करून देण्यासाठी मंगळवारपासून (ता. ३) विशेष कॅम्पचे आयोजन केले आहे. ६ जानेवारीपर्यंत विविध विभागीय कार्यालयात कॅम्प होणार आहे.
गांधी मैदान विभागीय कार्यालय (ता. ३), छत्रपती शिवाजी चौक विभागीय कार्यालय (ता. ४), राजारामपुरी विभागीय कार्यालय (ता. ५), ताराराणी विभागीय कार्यालयात (ता. ६) कॅम्पचे आयोजन केले आहे. मिळकतधारकांनी प्रॉपर्टी कार्ड, सात बारा उतारा, इंडेक्स उतारा, खरेदीपत्र, कब्जेपट्टी, लाईट बिल, बांधकाम प्रारंभ व भोगवटा प्रमाणपत्र तसेच अपार्टमेंट असल्यास बिल्डर व डेव्हलपर यांचे नाव व पत्ता असलेली कागदपत्रे तसेच ज्यांना आता पावती येत नाही अशा मिळकतधारकांनी घरफाळा भरल्याची पावतीसह अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.