
मुलांचे बालपण हिरावू नका
ich38.jpg
72880
इचलकरंजी ः यड्राव (ता. शिरोळ) येथील अल्फोन्सा स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना नीकेश खाटमोडे-पाटील. शेजारी फादर जोबी आदी.
-------
अल्फोन्सा स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
इचलकरंजी ः मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका, त्यांना फुलू द्या, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नीकेश खाटमोडे-पाटील यांनी केले. यड्राव (ता. शिरोळ) येथील अल्फोन्सा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सांगली मिशन संस्थेचे अध्यक्ष फादर जोबी अध्यक्षस्थानी होते. स्नेहसंमेलनात समूहगीते, संगीत, नाटक, व्हायोलीन वादन यासारखे अनेक कार्यक्रम झाले. ख्रिसमस सोहळा, पारंपरिक नृत्य सादर केले. प्रत्यक्ष घोड्यावरून रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचा प्रसंग सादर केला. प्रेमोबाईलचे दुष्परिणाम यावर मूकनाट्य सादर केले.