
राजोपाध्येनगरात चोरी
राजोपाध्ये नगरात चोरी
कोल्हापूर : राजोपाध्ये नगरात रिंगलेट रेसीडेन्सीमध्ये बेडरूममधील तिजोरीतून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. २८ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान ही घटना घडली असल्याची फिर्याद अमितसिंह रमेशसिंह परदेशी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.
२८ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान ते परगावी असल्यामुळे घर बंद होते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली. घरातील बेडरूममध्ये असलेल्या तिजोरीतून सुमारे साडेतील लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये १० हजार रोख, ३७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याचे कानातील ४२ ग्रॅमचे दागिने, यामध्ये रिंगा, झुमके, कर्णवेल, सोन्याचे दोन १७ ग्रॅमचे गोप, साडेतीन ग्रॅमची सोन्याची ठुसी, सात ग्रॅमचा नेकलेस कर्णफुले यांचा समावेश असल्याची फिर्याद परदेशी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे.