गवताळ प्रदेश पश्‍चिम महाराष्ट्रातील; दुग्धोत्पादनाचा अनोन्य संबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवताळ प्रदेश पश्‍चिम महाराष्ट्रातील; दुग्धोत्पादनाचा अनोन्य संबंध
गवताळ प्रदेश पश्‍चिम महाराष्ट्रातील; दुग्धोत्पादनाचा अनोन्य संबंध

गवताळ प्रदेश पश्‍चिम महाराष्ट्रातील; दुग्धोत्पादनाचा अनोन्य संबंध

sakal_logo
By

74919/74920

लोगो बिग स्टोरी
-
स्वस्त गवत, पशुधनासाठी मस्त!

आर्थिक, पर्यावरणीय दृष्टीबरोबर मानवजातीचे अस्तित्वच मुळात गवतांवर अवलंबून आहे. नैऋत्य मॉन्सून पावसाच्या आगमनाबरोबर गवताला फूट येते; मात्र उन्हाळ्यातील शुष्क काळात गवत वाळते. पाळीव गुरांना खाद्य म्हणून ग्रामीण भागांत चराऊ कुरणे, गायरान राखण्याची पद्धत आहे. हवामान बदल, पर्जन्यमानाचा गवताच्या वाढीवर परिणाम होतो. गवताचे प्रमाणही कमी होते, अशा नोंदी वनस्पती शास्त्रज्ञांनी नोंदविल्या. गवत कमी झाले की, दुग्धोत्पादन, निसर्गातील अन्नसाखळीवर थेट परिणाम होतो. पश्‍चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या गवतांच्या प्रजाती, सध्याची गवतांच्या स्थितीवर डॉ. गिरीश पोतदार यांनी संशोधन केले. एकूणच गवताचा घेतलेला आढावा...
...
- अमोल सावंत
--
गवतांशिवाय जगणे कठीण
मोसमी पावसाच्या हवामानामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात नैसर्गिक गवताळ प्रदेश कमी आढळतात. हवामान, मातीमधील भिन्नतेनुसार गवताळ भूमी निर्माण झाली. गवताळ प्रदेशाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, गवताळ प्रदेशाचा ऱ्हास सुरू आहे. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध असे दोन प्रकार आहेत. उष्ण/समशीतोष्ण कटिबंधातील भागात साधारण ५०० ते १३०० मि.मी. दरम्यान पाऊस पडतो. पावसामुळे सच्छिद्र जमिनीवर गवताची निर्मिती होते. गवताळ प्रदेश म्हणजे पडीक जमीन, गायरान जमीन असा समज आहे, पण तो चुकीचा आहे. गवत नसते, तर दुग्धोत्पादनाबरोबर जैववैविधता निर्माण झालीच नसती.
...
पश्‍चिम महाराष्ट्रातील गवतांचे प्रकार
पश्‍चिम महाराष्ट्रात ३०० प्रजातीचे गवत आढळते. यात तांबट, मारवेल, जेतारे/मारवेल, वरीचा तांदूळ/मोरधन, काळी कुसळी, बतानी/बुंदेन, पोकळ्या/फुलाडा, कुंदा/नथ ही गवताची प्रजाती दिसते. दुभती जनावरे ही घागरा, होलेरा, खारवेल, फुलीया, तांबट, मारवेल, जेतारे/मारवेल, वरीचा तांदुळ/मोरधन, काळी कुसळी, कुरसळी, नानीसुंखळी, पांढरी सुकळी, बतानी/बुंदेन, पोकळ्या/फुलाडा, कुंदा/नथ ही गवते खातात.
...
दुग्धोत्पादनाचा संबंध
गवत पशुधनासाठी सर्वोत्तम, स्वस्त खाद्य आहे. दुधाचे उत्पादन, दुधाची प्रत ही गवताच्या प्रजातींवर अवलंबून असते. साधारणपणे गवतात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, मेद, तंतूमय पदार्थ कमी-जास्त प्रमाणात असतात.
...

दूध वाढविणारी गवत प्रजाती
पश्चिम महाराष्ट्रात मुख्यतः शेतकरी हायब्रीड नेपियर गवताची लागवड करतात. ऊस, मका, भात, बाजरी आदी पिकांचा वापर कापणीनंतर चारा म्हणून करतात. चिमणचारा, घोळशेप, मारवेल, बारड, काळी कुसळी, बोराटी, रानबोराट, पवना, शेडा, फुलोरा, बारकी, बुंदन, फुलांडा, भेरडा या प्रजातींमुळे दुभती जनावरांकडून दूध अधिक मिळते. पश्‍चिम महाराष्ट्रात बुंदन, फुलांडा, भेरडा, रोशा, कुसळी गवत, फुलोरा, काळी कुसळी, पवना, चिमणचारा, आगीव, वागनकी, घनगा ही गवत प्रजाती दिसते.
...

गवत कमी होण्याची कारणे
-गवताळ प्रदेशांना आगी लावणे
-पाळीव प्राण्यांची गवताच्या ठिकाणी अतिचराई
-शेती लागवडीखाली आणलेले क्षेत्र
-धरणे, बांधकाम आणि उद्योगांची उभारणी
...

गवत संवर्धनासाठी हे करा
- अतिचराई कमी करणे, जनावरांसाठी उपयुक्त गवतांची लागवड करणे
- गवताळ प्रदेश, जंगलांत शेतीचा प्रसार कमी करण्यासाठी शेतीचे व्यवस्थापन करणे
- गवताळ भागांची स्थिती, क्षमता पाहण्यासाठी नियमित सर्वेक्षण व संरक्षण करणे
- गवताळ परिसंस्थांच्या संवर्धनासाठी धोरणे, कायदे करणे
-पाणथळ प्रदेशांभोवती बफर झोन तयार करणे
-ग्रामस्थ, शेतकरी, पर्यटकांमध्ये जनजागृती
-उन्हाळ्यात मानव निर्मित वणवे रोखणे
...
चौकट 74587
यशवंतराव चव्हाण यांचे नाव
गवत कुळातील नवीन वनस्पती प्रजातीला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (स्व.) यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले. नवीन वनस्पतीचे ‘कॅपिलिपेडीयम यशवंतराव’ असे नामकरण केले. मध्यप्रदेशात आढळणारे हे दुर्मिळ गवत आहे.
...
कोट
१९८९ पासून शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. आर. यादव आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी देशातील अनेक भागातून नवीन १० प्रजातींचा शोध लावला. त्यापैकी सात प्रजाती पश्चिम महाराष्ट्रातून शोधल्या.
-डॉ. गिरीश पोतदार, वनस्पतीशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कऱ्हाड