
अमल महाडिक
वाढीव सिटी सर्व्हे करून
सर्वभागांना प्रॉपर्टी कार्ड द्या
माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः महापालिका हद्दीतील सिटी सर्व्हे न झालेल्या भागात सर्व्हे करून सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरातील सिटीसर्व्हे हद्दीची वाढ झालेली नाही. मूळ सिटी सर्व्हे १९३५ ते १९४५ पर्यंत झालेला आहे. तर कसबा बावडानंतर फुलेवाडीचा काही भागाचा सर्व्हे झाला. आज महानगरपालिकेची हद्द पाहता सर्व क्षेत्राचा सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे अंदाजे ८० हजार मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पंतप्रधान आवास योजना, बांधकाम परवाना, कर्ज प्रक्रिया, तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. वाढीव सर्व्हेसाठी २०१६ मध्ये भूमी अभिलेख विभागाने प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावामध्ये मोजणीची रक्कम महापालिकेने भरावी असे नमूद केले होते. आवश्यक रकमेची शासन स्तरावरून तजवीज करून ज्या भागाचा सर्व्हे झालेला नाही, त्याची मोजणी होऊन सर्व मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी योग्य कार्यवाही करावी.