महावीर अध्यासनाला जानवे यांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर अध्यासनाला जानवे यांची देणगी
महावीर अध्यासनाला जानवे यांची देणगी

महावीर अध्यासनाला जानवे यांची देणगी

sakal_logo
By

73086
कोल्हापूर ः भगवान महावीर अध्यासनाला देणगी देणाऱ्या प्रा. अशोक जानवे यांना डॉ.विजय ककडे यांनी पुस्तक भेट दिले. यावेळी आर.बी.पाटील उपस्थित होते.

‘महावीर अध्यासनाला’ जानवे यांची देणगी
कोल्हापूर, ता. ३ : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाला प्रा. अशोक दिनकर जानवे यांनी ११ हजार रुपयांची बृहत देणगी दिली. अध्यासनाचे प्रा. डॉ. विजय ककडे यांच्याकडे सुपूर्त केली. प्रा. अशोक जानवे हे बिद्री दूध साखर महाविद्यालयातून निवृत्त झाले आहेत. ते समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच प्राध्यापक आर. बी. पाटील यांचे विद्यार्थी आहेत. देणगीबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी अजित चौगुले यांनी प्रा. जानवे यांचे आभार मानले. भगवान महावीर अध्यासनाच्या इमारत बांधकामास व्यक्ति व संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन डॉ. विजय ककडे यांनी केले आहे.