
प्रायव्हेट हायस्कूल सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
73083
कोल्हापूर : प्रायव्हेट हायस्कूलच्या सर्वसाधारण सभेमध्ये भूपेंद्र शहा यांचा सत्कार करताना अरुण डोंगरे. या वेळी (डावीकडून) मदन कुलकर्णी, उदय सांगवडेकर, डॉ. ज. ल. नागांवकर, विनोद डिग्रजकर.
दि प्रायव्हेट एज्युकेशन
सोसायटीची वार्षिक सभा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या प्रांगणात झाली. सभेचे अध्यक्षपद संस्थेचे उपाध्यक्ष भूपेंद्र शहा यांनी भूषविले.
संस्थेचे कार्यवाह एस. आर. डिंगणकर यांनी मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. नियामक मंडळाचे सदस्य मदन कुलकर्णी यांनी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य भूपेंद्र शहा यांचे नाव सूचित केले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. क. ग. सोळांकूरकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. शहा यांचा सत्कार संचालक अरुण डोंगरे यांनी केला. या वेळी नूतन सदस्य डॉ. आशुतोष देशपांडे यांनी आभार मानले. या वेळी मदन कुलकर्णी, उदय सांगवडेकर, ज. ल. नागांवकर, विनोद डिग्रजकर उपस्थित होते.