Wed, Feb 8, 2023

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित
Published on : 3 January 2023, 5:36 am
घरात घुसून महिलेस धक्काबुक्की
कोल्हापूर ः देवकर पाणंद परिसरातील राजलक्ष्मीनगरात महिलेच्या घरात घुसून त्यांना धक्काबुक्की करून चाकूचा धाक दाखविल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी सांगितले, की गौरी ओंकार नागावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३१ डिसेंबरच्या सायंकाळी शैलेश स्वामी, कल्याणी आणि कल्याणीची बहीण (पूर्ण नावे समजली नाहीत) यांच्यासह अन्य दोघे घरात घुसले. या वेळी फिर्यादी आणि त्यांच्या आजी घरी होते. या वेळी ओंकार नागावकर कोठे आहेत, असे विचारून दोन महिलांनी फिर्यादी गौरी यांना धक्काबुक्की करून त्यांच्या पतीस मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.