महावीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावीर
महावीर

महावीर

sakal_logo
By

73090
कोल्हापूर ः वीरमाता संगीता कुंभार यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे. शेजारी अन्य मान्यवर.

माजी विद्यार्थ्यांचे योगदान
मोलाचेः डॉ. राजेंद्र लोखंडे

कोल्हापूर, ता. ३ ः महावीर महाविद्यालयाच्या बी.ए.बी.एड. विभागाने सर्वोत्तम शिक्षक दिले. माजी विद्यार्थ्यांच्या भावजीवनावर महाविद्यालयाच्या परिसराचा व शिक्षकांच्या संस्कारांचा ठसा असल्याचे जाणवते. येथे आपण घडल्याचे विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले अनुभव व महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले
बी.ए.बी.एड विभाग माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी विद्यार्थी अशोक धोत्रे, ताज मुल्लाणी, के. डी. पाटील, नाथाजी चौगुले, उपस्थित होते.
बी.ए.बी.एड. विभागाचे समन्वयक डॉ. महादेव शिंदे, माजी विद्यार्थी मिनाज गवंडी, सुहास पाटील, मनोहर पाटील, अनिता पवार, संगीता कुंभार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. विनोद कांबळे या विद्यार्थ्यांनी मनोगतात महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
वीर माता माजी विद्यार्थीनी संगीता कुंभार, विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा, महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संघाच्या उपाध्यक्षा प्रियांका पाटील यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी संघ समिती समन्वयक प्रास्ताविक डॉ. गोपाळ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ पाटणकर यांनी केले. संघाचे सचिव बसवराज वस्त्रद यांनी आभार मानले.