Sun, Jan 29, 2023

युगंधरा फौंडेशनची कार्यकारिणी जाहीर
युगंधरा फौंडेशनची कार्यकारिणी जाहीर
Published on : 4 January 2023, 11:40 am
युगंधरा फौंडेशनची कार्यकारिणी जाहीर
इचलकरंजी ः येथील युगंधरा फौंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी रेणू सपकाळे, उपाध्यक्षपदी योगीता धोत्रे आणि खजिनदारपदी ऐश्वर्या कवडे यांची निवड केली आहे. मराठा महासंघाचे वैभव खोंद्रे, अभिजित जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप केले. शहरातील युवतींनी एकत्र येऊन या फौंडेशनची स्थापना केली आहे. कार्याचा आढावा संस्थापिका ज्योतिकीरण माने यांनी प्रास्ताविकात घेतला. प्रियांका कुंभार यांनी आभार मानले.