शाहू विद्यालयात टॉक शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू विद्यालयात टॉक शो
शाहू विद्यालयात टॉक शो

शाहू विद्यालयात टॉक शो

sakal_logo
By

शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या टॉक शो
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजन

कोल्हापूर, ता. ४ ः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त छत्रपती शाहू विद्यालयाचे माजी विद्यार्थी टॉक शोद्वारे संवाद साधणार आहेत. न्यू पॅलेस परिसरातील शाहू विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी (ता. ६) दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल. शाहू विद्यालयाचे ३५० हून अधिक विद्यार्थी या टॉक शोमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती उद्योजक अभिषेक मोहिते, संचित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टॉक शोसाठी शहर आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनांही निमंत्रण दिले आहे. यानुसार अंदाजे बाराशेहून अधिक आजी-माजी विद्यार्थी सहभागी होतील. या कार्यक्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांसमवेत मुक्तसंवाद साधता येणार आहे.
माजी विद्यार्थ्यांतर्फे शनिवारी (ता. ७) सकाळी नऊ वाजता न्यू पॅलेस ते शाहू विद्यालय या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे. तसेच एक्सलन्स ॲवॉर्ड आणि स्कॉलरशिपसाठी ७५ हजार रुपयांची रक्कम महाराजांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, आशपाक आजरेकर, शिवतेज खराडे, माजी नगरसेवक अर्जुन माने, अपूर्वा जाधव-मोहिते, जाहिरा काझी खान, पल्लवी सरपोतदार-देशपांडे, प्रार्थना ओसवाल व माजी विद्यार्थी उपस्थित होते.