कोवाड-ऊस वजन काट्याची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-ऊस वजन काट्याची तपासणी
कोवाड-ऊस वजन काट्याची तपासणी

कोवाड-ऊस वजन काट्याची तपासणी

sakal_logo
By

kwd43
73315
कोवाड ः वजन काट्याची तपासणी करताना भरारी पथक.

‘हेमरस’चा वजनकाटा अचूक
भरारी पथकाकडून तपासणी; शेतकऱ्यांत समाधान

कोवाड, ता. 4 ः राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याला जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या वजन काटा तपासणी भरारी पथकाने बुधवारी दुपारी भेट देऊन वजन काट्याची तपासणी केली. वजन काटा अचूक व निर्दोष असल्याचा अहवाल भरारी पथकाने कारखाना प्रशासनाला दिला. भरारी पथकाने शेतकऱ्यांच्या समक्ष वजनाची खात्री केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
साखर आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणीसाठी नेमलेल्या भरारी पथकाने आज हेमरस कारखान्याच्या वजन काट्याची दोन तास तपासणी केली. भरारी पथकप्रमुख तहसीलदारांसह पोलिस उपनिरीक्षक, निरीक्षक वैधमापन शास्त्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रतिनिधी, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग 1 यांचा पथकात समावेश होता. यावेळी शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी माहिती दिली. भरारी पथकाने ऊस भरुन आलेल्या वाहनांचे वजन केले. भरारी पथक जाण्यापूर्वी वजन केलेल्या वाहनांची पुन्हा तपासणी केली. रिकाम्या वाहनांचेही वजन केले. ट्रॅक्टर ट्रॉल्या व ट्रकमधील ऊसाच्या वजनाची तपासणी केली. वजन काटा योग्य व बिनचूक असल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. त्यावेळी शेतकरी, वाहनधारकांनाही भरारी पथकाचे सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी काट्याबाबत माहिती दिली. पथकाच्या निष्कर्षाने वजन काट्याबाबत विश्वासार्हता निर्माण झाल्याचे शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले.