गड-शिष्यवृत्ती निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-शिष्यवृत्ती निकाल
गड-शिष्यवृत्ती निकाल

गड-शिष्यवृत्ती निकाल

sakal_logo
By

आठवीत वाढले; पाचवीत घटले
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल ; आठवीचे ३२ तर पाचवीचे २६ विद्यार्थी चमकले

गडहिंग्लज, ता. ५ : पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. गडहिंग्लज तालुक्यातील आठवीचे ३२ तर पाचवीचे २६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. गतवर्षीचा विचार करता यंदा आठवीत सहा विद्यार्थी वाढले आहेत. पण, पाचवीत एकाने घट झाली. ग्रामीण व शहरीचा विचार करता पाचवीत ग्रामीणचे सात तर शहरीचे १९ विद्यार्थी चमकले. तर आठवीत ग्रामीणचे १२ व शहरातील २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी - पाचवी ग्रामीण- मिताली बामणे (मरगुद्रीवाडी), सानवी पाटील (हडलगे), अनुष्का कानडे (खणदाळ), अदित्य गोरुले (नरेवाडी), प्रणव पाटील (करंबळी), अमृता पाटील (हुनगिनहाळ), नैतिक पाटील (नेसरी). शहरी- स्वरूप साळवे, श्रीधर मगदूम, अमेय पोवार, हेरंब मांगले, अमोघ सदाफुले, सोनाली पाटील, मुग्धा खवरे, अथर्व देसाई, प्रेरणा रावण, अमृता पाटील, इशा मुल्ला, इकरा ठगरी, सई पाटील, ऋतुराज शेलार, सृष्टी माने, समर्थ देसाई (सर्व छत्रपती शिवाजी विद्यालय), सिद्धी कांबळे, शर्वरी पाटील (बॅ. नाथ पै विद्यालय), समर्थ शिंदे (जागृती हायस्कूल).
आठवी ग्रामीण- प्रणाली देसाई, सिद्दीका देसाई (ऐनापूर), निरंजन पाटील (हरळी खुर्द), सिद्धी नाईक (महागाव), मानसी तांबडे (हलकर्णी), श्रेया पाटील (हरळी बुद्रुक), ओंकार पाटील, सृष्टी शिट्याळकर (नेसरी), प्रथमेश माळी (करंबळी), प्रांजल सूर्यवंशी (नूल), जयदीप गाडीवड्ड (कौलगे), मधुरा चोरगे (अत्याळ). शहरी- प्रतीक पाटील, ओंकार पाटील, समीक्षा तोरस्कर, मयुरी पाटील, दीपाली पाटील, यश सासुलकर, स्वयम कुंभार, सुयश भोईटे, श्रेयस पाटील, सत्यम माने, श्रुती जोशी, राजवर्धन फडके, श्रुती गोखले, आदित्य शिंदे, युगंधर माने (वि. दि. शिंदे हायस्कूल), वेदांत काळे, संजना पाटील, श्रावणी पालकर, नयन साळवेकर, वेदांत रोटे (जागृती हायस्कूल).
------------------
चौकट...
वेळापत्रक विस्कळीत होऊनही...
वास्तविक शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीत होते. मात्र, विविध कारणांनी तब्बल तीनवेळा परीक्षा पुढे ढकलली. अखेर सहा महिन्यांनी ऑगस्टमध्ये परीक्षा झाली होती. परीक्षेचे वेळापत्रक विस्कळीत होऊनही विद्यार्थ्यांनी चिकाटी व अभ्यासात सातत्य दाखविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा पाच विद्यार्थी वाढले आहेत.