सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन

sakal_logo
By

ich51.jpg
73376
इचलकरंजी : स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना अशोक स्वामी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले.

सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
इचलकरंजी : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी इस्माईल समडोळे सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूल माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग सहकारी महासंघ चेअरमन अशोक स्वामी यांनी दिले. ते सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इस्माईल समडोळे होते. यावेळी विविध स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले. सुनील तोडकर, शकील शेख, दिलीप जोशी, इलियास समडोळे, अब्बास लतीफ, नेताजी जाधव, बीबीमरियम समडोळे आदी उपस्थित होते.