Mon, Feb 6, 2023

पुजारी, करवा यांची निवड
पुजारी, करवा यांची निवड
Published on : 5 January 2023, 1:04 am
73476
पुजारी, करवा यांची निवड
इचलकरंजी : येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या दीपा पुजारी व प्रीती करवा यांची बारामती येथे होणाऱ्या मिनी ऑलंपिक कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज त्यांना मंडळातर्फे शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे मत या वेळी व्यक्त केले. अध्यक्ष संजय कुडचे, भूषण शहा, अतुल बुगड, बाळू काकडे आदी उपस्थित होते. त्यांना सचिव तथा प्रशिक्षक शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.