Sun, Jan 29, 2023

मनपा निवडणूक
मनपा निवडणूक
Published on : 5 January 2023, 2:50 am
निवडणुकीबाबत चर्चेसाठी
पालकमंत्र्यांकडे वेळेची मागणी
कोल्हापूर, ता. ५ : महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दौऱ्यात वेळ मिळावी म्हणून कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना पत्र दिले आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे झाली आहेत. या कालावधीमध्ये अंकुश ठेवणारी यंत्रणाच नसल्याने कारभार अनियंत्रित झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घ्या, असा आदेश दिला असतानाही दोन वर्षे निवडणूक होत नाही, ही बाब गंभीर आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यात वेळ मिळावी, अशी मागणी केली आहे.