शहरातील लसीकरण थांबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील लसीकरण थांबले
शहरातील लसीकरण थांबले

शहरातील लसीकरण थांबले

sakal_logo
By

शहरातील लसीकरण थांबले
दोन लाख नागरिकांना बूस्टर डोसची प्रतीक्षा
कोल्हापूर, ता. ५ : कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या आरोग्य केंद्रावरील लसीकरण थांबले आहे. महापालिकेने लस मागवली असून ती उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. एक लाख ९४ हजारांवरील नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही.
शहरातील चार लाख ८३ हजार ७२९ नागरिकांनी पहिला (१०१ टक्के), तर चार लाख २६ हजार ९८८ नागरिकांनी दुसरा (८८ टक्के) डोस घेतला आहे. ६८,५९३ जणांनी बूस्टर घेतला असून एक लाख ९४ हजार ४७३ नागरिकांची मुदत झाली असली, तरी अजून बुस्टर डोस घेतलेला नाही. कोव्हॅक्सिनच्या लशीचा साठा डिसेंबरअखेर चालणार होता. तीन हजारच्या आसपास लस शिल्लक होती; पण त्या कालावधीत फारसे बूस्टरसाठी आले नाहीत. चीनमधील बातम्या समजल्यानंतर परदेशात जाणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या केंद्रांवर विचारणा करण्यास सुरुवात केली. आता दोन्ही लस संपलेल्या आहेत. त्याची मागणी केली आहे. लसीकरणासाठी आता प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय नाही. ज्यांना परदेशात जाण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे, ते खासगीमध्ये, जिथे परजिल्ह्यात लस उपलब्ध असेल तिथे जाऊन घेत आहेत.