प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी बातमी
प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी बातमी

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहणी बातमी

sakal_logo
By

प्रदूषण नियंत्रण मंडळाने
केली मृत माशांची पाहणी

नदीतील पाण्याचे नमुने पृथ्करणासाठी पाठवले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः पंचगंगा नदीमध्ये कसबा बावडा आणि शिये पुलाजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत होण्याची घटना घडली. त्यानंतर प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन दिवस नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पाहणीचा विस्तृत अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने बनवला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरभड यांनी ही पाहणी केली. त्यांनी दिलेल्या अहवालातील माहितीनुसार, कसबा बावडा-शिये पुलाजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचे पाहणीत आढळले. येथील पाण्याचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले. नदी काठाजवळील गावांचे सांडपाणी नदीमध्ये मिसळत असल्याचे पाहणीत दिसून आले. कारखान्याचे प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपच्या एअरव्हॉलला गळती असल्याचे दिसून आले. या पाण्याचे नमुनेही घेण्यात आले. महापालिका क्षेत्रामध्ये बावड्यातील सांडपाणी नदीमध्ये मिसळत असल्याचे पाहणीत दिसून आले. दुधाळी आणि बावडा येथील प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे आढळून आले. येथील पाण्याचेही नमुने घेतले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. रंकाळा तलावातही मेलेले मासे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले. त्याचे प्रमाण कमी होते असे सांगण्यात आले.