गांधीगिरीने सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीगिरीने सत्कार
गांधीगिरीने सत्कार

गांधीगिरीने सत्कार

sakal_logo
By

73650

‘प्रदूषण नियंत्रण’अधिकाऱ्यांचा
भाजपतर्फे गांधीगिरीने सत्कार

कोल्हापूर, ता. ६ ः कचरा घोटाळ्यानंतरही महापालिकेवर कोणतीही कारवाई न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा भाजपतर्फे गांधीगिरीने गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. कचरा घोटाळा उघडकीस आणून वर्ष झाले.
६ जानेवारी २०२२ ला भाजपने महापालिकेचा कचरा विनाप्रक्रिया कसबा बावड्यातील शेतात टाकल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचेही स्पष्ट झाले होते. त्या ठिकाणी विनाप्रक्रिया कचरा टाकल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारानेही मान्य केले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आजअखेर महापालिकेवर, ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. शेतात टाकलेला कचराही उचलला गेला नाही. याविरोधात आज भाजप महानगर उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, उपप्रादेशिक अधिकारी माने यांचा गांधीगिरीने गुलाब देऊन सत्कार केला.