Fri, Feb 3, 2023

महाजन बदली
महाजन बदली
Published on : 6 January 2023, 5:56 am
‘टीपी’चे सहाय्यक संचालक महाजन यांची बदली
कोल्हापूर, ता. ६ ः महापालिकेच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांना बढती मिळाली. त्यांची अकोला येथे बदली झाली असून, तिथे सोमवारी उपसंचालक म्हणून ते रूजू होणार आहेत.
महाजन यांची ऑक्टोबर २०२० मध्ये महापालिकेत सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या बढतीचे आदेश आज आले. त्यांचा कार्यभार जिल्हा नगररचना विभागातील सहाय्यक संचालक अनिल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.