महास्वच्छता मोहिमेत दोन टन कचरा संकलित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महास्वच्छता मोहिमेत 
दोन टन कचरा संकलित
महास्वच्छता मोहिमेत दोन टन कचरा संकलित

महास्वच्छता मोहिमेत दोन टन कचरा संकलित

sakal_logo
By

73851
कोल्हापूर : महापालिकेतर्फे आज शहरात राबवण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी झालेली शाळकरी मुले., 73852
कोल्हापूर : महास्वच्छता अभियानांतर्गत आयोजित वॉल पेंटींगमध्ये सहभागी झालेल्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे.

महास्वच्छता मोहिमेत
दोन टन कचरा संकलित
महापालिकेचा पुढाकार; शाळांसह स्वयंसेवी संस्थेचा उर्त्स्फुत सहभाग
कोल्हापूर, ता. ७ : महापालिकतर्फे राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात दोन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला.
महापालिकेका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार शहरामध्ये १६ डिसेंबर ते १६ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यातून राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शहरातील प्रेक्षणिय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्ते, चौक या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत दोन जेसीबी, दोन डंपर, १८ ट्रॅक्टर ट्रॉली, दोन पाणी टँकरचा वापर करण्यात आला.
शाहु समाधी स्थळ परीसर, शाहू मिल चौक, खासबाग मैदान परिसर,पंचगंगा नदी घाट परीसर, पिकनीक पाँईट मेनरोड, रंकाळा टॉवर, अंबाई टँक, इराणी खण, पदपथ उद्यान, पदमाराजे उद्यान, महालक्ष्मी मंदीर व भवानी मंडप परीसर आदि ठिकाणी ही मोहिम राबवण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह शाहू समाधी स्थळ व पंचगंगा नदी घाट परिसर या ठिकाणी फिरती करुन शालेय विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता केली. या महास्वच्छता अभियानात बावड्यातील महापालिका व इतर शाळांतील विद्यार्थ्यांनी राजाराम बंधारा घाट परिसरात संपूर्ण लोटुन साफ सफाई करुन प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पुशवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, स्वच्छता दूत अमित देशपांडे, स्वावलंबन कला क्रिडा मंडळ, क्रिडाईचे सदस्य, सरदार कॉलनी, लष्कर पार्क मधील नागरीक, व्हाईट आर्मीचे जवान, सर्व आरोग्य निरीक्षक यांनी सहभाग नोंदवला.
-------------
चौकट
वॉल पेंन्टीगमध्ये प्रशासकांचाही सहभाग
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरात आयटीआय कॉलेजच्या भिंतीवर विशेष वॉल पेंन्टीग मोहिम घेण्यात आली. या मोहिमेत कला निकेतन महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थी, विद्यार्थींनी व शिक्षक यांनी वेगवेगळया थीमचे भिंतीवर रंगकाम करण्यात आले. या मोहिमेवेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर वॉल पेंन्टीग केले..