
चिमासाहेब महाराजांना भिवादन
73913
कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशन व हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे शनिवारी सायंकाळी चिमासाहेब महाराजांना अभिवादन करण्यात आले.
चिमासाहेब महाराजांना अभिवादन
कोल्हापूर, ता. ७ : छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीतून १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र लढा सुरू होता. छत्रपती घराण्यातील चिमासाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली फिरंगोजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रांतिकारी कार्य व्यापक करून जुलमी सत्तेला सुरुंग लावण्याचे काम केले. अशा या क्रांती लढ्याचे मार्गदर्शक चिमासाहेब महाराजांच्या १८४ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हा बार असोसिएशन व हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे सीपीआर परिसरातील क्रांतिवीर चिमासाहेब चौकातील क्रांती उद्यानात हा कार्यक्रम झाला.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, अॅड. सुधीर चव्हाण, हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, जयकुमार शिंदे, लक्ष्मण मोहिते, सुनील हंकारे, अॅड. विजयकुमार ताठे-देशमुख, माजी अध्यक्ष अजित मोहिते, ॲड. वारणा सोनवणे, ॲड. अश्विनी निपाणे आदी उपस्थित होते.
------------
वाढीव पेन्शन आदेश
माहितीसाठी मंगळवारी सभा
कोल्हापूर ः ईपीएस ९५ च्या पेन्शनरांमध्ये सध्या पेन्शनवाढीबाबत गोंधळाची अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने काढलेली पत्रके, दिल्लीतील आंदोलन याबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता.१०) बैठकीचे आयोजन केले आहे. सर्व श्रमिक संघातर्फे सायंकाळी चार वाजता लक्ष्मीपुरीतील श्रमिक कार्यालयात ही सभा होणार असून, संघटनेचे सहनिमंत्रक अतुल दिघे मार्गदर्शन करणार आहेत. सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर यांनी केले आहे.