
पालकमंत्री बक्षिस
फोटो- ७३९३१
कोल्हापूर ः शाहू खासबाग मैदानात झालेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करताना पालकमंत्री दीपक केसरकर. डावीकडून आदिल फरास, माऊली जमदाडे, सिकंदर शेख, प्रकाश बनकर, विश्वास हारूगले, तौफीक मुल्लाणी.
पालकमंत्र्यांकडून मल्लांना रोख बक्षीस
---
कोल्हापूर, ता. ७ ः शाहू खासबाग मैदानात झालेल्या कुस्ती स्पर्धेतील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीतील विजेत्यांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रोख बक्षीस देऊन गौरव केला. या दोघांचे वस्ताद विश्वास हारूगले यांचाही रोख २५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. श्री. केसरकर यांनी पहिल्या क्रमांकाची कुस्ती जिंकलेला शेख याला एक लाख, तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीतील विजेता प्रकाश बनकर याला ५० हजारांचे रोख बक्षीस दिले. दोन्ही मल्ल येथील विजयी शाहू गंगावेश तालमीचे आहेत. मैदान संपल्यावर या दोन्ही पैलवानांसह त्यांचे वस्ताद हारूगले यांना शासकीय विश्रामगृहावर घेऊन येण्याची जबाबदारी माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी व आदिल फरास यांच्यावर श्री. केसरकर यांनी सोपवली होती. श्री. केसरकर म्हणाले, ‘‘गंगावेश तालमीचा लौकिक देशभर पोचला पाहिजे, त्यासाठी लागेल तेवढी मदत करू. मल्लांच्या यशात वस्तादांचाही मोठा वाटा असतो. म्हणूनच हारूगले यांचाही सत्कार केला.’’ या वेळी महान भारत केसरी माऊली जमदाडे, शिंदे गटाचे माने उपस्थित होते.