हापूस आंबा आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस आंबा आगमन
हापूस आंबा आगमन

हापूस आंबा आगमन

sakal_logo
By

73936
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डातील फळ बाजारात यंदाच्या हंगामात शनिवारी पहिल्या कोकणी हापूस पेटीचा सौद्या काढला. त्यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडीक. शेजारी अडते, व्यापारी, शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी.

आब्याच्या पहिल्या पेटीस ५१ हजार
सौद्यात मुहूर्त; खासदार महाडिक यांच्याकडून खरेदी, देवगडची आवक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : हापूस आंब्याचे कोल्हापूर बाजारपेठेत आगमन झाले असून येथील शाहू मार्केट यार्डातील फळ बाजारात यंदाच्या हंगामातील पहिल्या कोकणी हापूस पेटीचा आज सौदा झाला. यात खासदार धनंजय महाडिक यांनी ५१ हजार रुपयांनाही पेटी खरेदी करीत हंगामाचा गोडावा वाढवला.
शाहू मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारपेठेत यासिन बालम भाई बागवान यांच्या अडत दुकानात हे सौदे झाले. सुहास दिनकर गोवेकर (कुंभार माठ ता. देवगड) यांच्या भागातील यंदाचा प्रथम हापूस येथे दाखल झाला. यात पाच डझनाची पेटीचे सौदे निघाला तो खासदार महाडिक यांनी खरेदी केला.
या वेळी महाडीक म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, शेतकरी, व्यापारी, अडते, माथाडी अशा सर्वच घटकांच्या हिताचा कारभार येथे व्हावा जेणे करून शेतीमालाला चांगला भाव देणारी बाजार म्हणून बाजारपेठेचा लौकिक वाढेल अशी अपेक्षा आहे.’’
बाजार समितीच माजी सदस्य नंदकुमार वळंजू, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील, तानाजी दळवी, गजानन पाटील, मोहन पडवळ, रामचंद्र नष्ठे, शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार आदी उपस्थित होते.
----------
चौकट
बाजार समितीच्या नव्या हंगामात प्रत्येक शेतीमालाचे मानाचे सौदे होतात. त्यानुसार हापूस आंब्याचे आगमण झाले त्याचेही मुहुर्ताचे सौदे झाले आजावर मुहूर्ताच्या सौद्याच्या इतिहास प्रथमच हापूस आंब्याच्या पाच डझनाची पेटी ५१ हजार अशा विक्रमी भावात खरेदी केली. यापुढे हंगाम सुरू होईल त्यानंतर आंब्याच्या भावाची तेजी राहील तर आवक वाढल्यानंतर भाव नियंत्रणात राहतील अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.