गड-ऐनापूर कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-ऐनापूर कार्यक्रम
गड-ऐनापूर कार्यक्रम

गड-ऐनापूर कार्यक्रम

sakal_logo
By

73970
ऐनापूर : बांधकाम कामगारांना साहित्य वितरणप्रसंगी समरजित घाटगे, विश्वजित पोवार, प्रवीण पोवार, लहूकुमार दड्डीकर, राजन दड्डीकर आदी.
-----------------------


शासकीय योजनांत राजकारण नाही
---
समरजितसिंह घाटगे; ऐनापुरात बांधकाम कामगारांना साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : ‘समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा माझा राजधर्म आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गट-तट न पाहता थेट लाभार्थ्यांना मिळवून देणार आहे. शासकीय योजनांच्या श्रेयवादात मला पडायचे नाही’, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे बूथप्रमुखांच्या पाटीचे अनावरण व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम झाला. या वेळी घाटगे बोलत होते. दड्डीकर गल्लीत हा कार्यक्रम झाला.
लहूकुमार दड्डीकर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल राजन दड्डीकर, आजरा एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील जाधव, ‘गोकुळ’मधून निवृत्तीबद्दल श्रावण दड्डीकर यांचा, तर शिष्यवृत्तीत यश मिळविलेल्या प्रांजली देसाई, सिद्धिका देसाई, पूजा जाधव, प्रीती चौगुले, जान्हवी कांबळे, ज्ञानेश्वरी घाटगे यांचा सत्कार झाला.
या वेळी रमेश दड्डीकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पोवार, चिमासाहेब देसाई, आंबाजी दड्डीकर, राजू कुराडे, विश्वजित पोवार, मारुती ढगे, सुधाकर दड्डीकर, सुनील दड्डीकर, सुभाष ढगे, नीळकंठ दड्डीकर, ईश्वर दड्डीकर आदी उपस्थित होते. श्रावण कांबळे यांनी आभार मानले.